गुरुजींच्या निधनाने केवळ पवार परिवारच नाही तर तालुक्यातील हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा मोठा वर्ग पोरका
आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ सदस्य, रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवक म्हणून सेवा देण्यात अग्रणी भूमिका घेणारे विश्व हिंदू परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष कै.लक्ष्मणराव रामभाऊ पवार गुरुजी यांचे नुकतेच निधन झाले. गुरुजींच्या निधनाने केवळ पवार परिवारच नाही तर तालुक्यातील हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा मोठा वर्ग पोरका झाला आहे. अयोध्या येथील रामजन्मभूमी भूमिपूजन दिनाच्या औचित्याने भाजपातर्फे आयोजित कार सेवकांच्या सत्कार सोहळ्यात गुरुजींचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले होते. त्यावेळी त्यांनी राममंदिर पूर्ण झाल्यावर अयोध्येला दर्शनासाठी घेऊन जाण्याची इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली होती. त्यावेळी मी सांगितले होते की तुमच्यासह चाळीसगाव तालुक्यातील सर्व कारसेवकांना अयोध्येला थाटात घेऊन जाईल. मात्र आज गुरुजींच्या अचानकपणे जाण्याने त्यांची ती इच्छा पूर्ण करू शकता येणार नाही याचं दुःख होत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत श्रीरामचंद्र व हिंतुत्ववादी विचारांना शिर्षस्थानी मानणारे कै.पवार गुरुजी आमचे प्रेरणास्थान राहतील. मी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने गुरुजींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो –