जळगाव जिल्ह्यातील एसटी कर्मचारी यांना बेस्ट वाहतूक उपक्रमातून वगळा तसेच त्यांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करा…

आमदार मंगेश चव्हाण यांची जिल्हाधिकारी व विभाग नियंत्रक यांच्याकडे मागणी…

चाळीसगाव – सद्यस्थितीत जळगाव जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे व कोविड पॉझीटीव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तसेच सद्यस्थितीत मुंबई हे देखील हॉटस्पॉट यादीमध्ये आहे. तरी सदर बाबतीत राज्य परिवहन विभागाच्या चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांना कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने व कोरोना संसर्ग जळगाव जिल्ह्यात जास्त असल्याने जळगाव विभागातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांना मुंबई बेस्ट उपक्रमातून वगळण्यात यावे अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य परिवहन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे तसेच
भविष्यात आवश्यकता असल्यास व जळगाव जिल्ह्यातील कोविड-१९ संसर्ग कमी झाल्यावर निश्चित जळगाव विभागातील कर्मचारी बेस्ट सेवा देण्यास तत्पर राहतील असे देखील त्यांनी आश्वस्त केले आहे.

यासोबतच आमदार चव्हाण यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देखील पत्र दिले असून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत व लॉकडाऊन नंतर प्रवाशांची केलेली सेवा पाहता त्यांना फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने कोविड लस देण्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यात त्यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधतांना नमूद केले आहे की, सद्यस्थितीत देखील महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी अविरत मेहनत घेत असताना दिसत आहेत. प्रवाशांना सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली असल्याचे समोर आलेले आहे. त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. तरीदेखील या बिकट परिस्थितीत एसटी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेताना दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण पोलीस, आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील ही लस उपलब्ध करून द्यावी.

Don`t copy text!