माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन यांची आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयाला धावती भेट…

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

जनसेवा क्लिनिक, महाराष्ट्र बँक येथील अत्याधुनिक निर्जंतुकीकरण कक्षाची केली पाहणी
व विविध उपक्रमांचे केले कौतुक

राज्याचे माजी जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री व राज्यात आरोग्यदूत म्हणून ओळख असणारे आमदार गिरीषभाऊ महाजन यांनी दि.१७ एप्रिल रोजी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी आमदार चव्हाण यांनी कार्यालयातच सुरू केलेल्या मोफत जनसेवा क्लिनिक व कार्यालयाच्या गेटवर व स्टेशन रोडवरील महाराष्ट्र बँके बाहेर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक निर्जंतुकीकरण कक्षाची पाहणी केली.
यावेळी चाळीसगाव शहरात आ.मंगेश चव्हान आणी भाजपाच्या माध्यमातून सुरू असलेली दररोज २००० गरजूंची अन्नसेवा, तालुक्यातील सर्व गावांना सोडियम हायपोक्लोराईड औषधी फवारणी, शहरात फवारणी साठी उपलब्ध केलेली फवारणी यंत्र, १० हजार मास्क वाटप, मध्यप्रदेश येथील ऊसतोड कामगारांना पोहोच केलेली मदत आदी उपक्रमांची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी गिरीषभाऊ महाजन यांना दिली.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राज्यात कोरोना मूळे रोजगार गमावलेल्या लाखो गरजूंसाठी मदत उभी केली जात असून त्यात जळगाव जिल्हा अग्रेसर असल्याचे माजी मंत्री महाजन यांनी सांगितले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, CA भुषण भोसले, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, माजी नगरसेवक सुशील वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गिरीषभाऊ महाजन यांनी सोशल डिस्टसिंग पाळण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी यांना देत सर्वांनी सामाजिक उपक्रम राबविताना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले.

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

Don`t copy text!