आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चाळीसगाव शहरासाठी ७ अत्याधुनिक औषध फवारणी यंत्र
आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र
भाजपा नगरसेवक व पदाधिकारी यांच्यामार्फत शहरभरात फवारले जाणार सोडियम हायपोक्लोराईड
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन – प्रशासन काम करत असताना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील कंबर कसली असून विविध माध्यमातून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या जनसेवा कार्यालयात गरजू रुग्णांसाठी मोफत दवाखाना, दररोज १५०० गरजू नागरिकांना घरपोच अन्नसेवा, ग्रामीण भागात १५० गावांना सोडियम हायपोक्लोराईड ची औषधी देण्यात येत आहे त्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी ७ अत्याधुनिक फवारणी यंत्र चाळीसगाव शहरासाठी आपल्या शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. सदर फवारणी यंत्र ही छोट्या ट्रॅकटर ला जोडून कार्यान्वित केली जात असून त्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपयुक्त असलेले सोडियम हायपोक्लोराईड औषध वापरले जात आहे.
चाळीसगाव नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात या सर्व ७ फवारणी यंत्रांची सुरुवात आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः ट्रॅकटर चालवून फवारणी केली. यावेळी नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजू अण्णा चौधरी, गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, बाप्पू अहिरे, सोमसिंग आबा राजपूत, मानसिंग राजपूत, चिरागोउद्दीन शेख, चंदू भाऊ तायडे, सौ.विजयाताई भिकन पवार, सौ.विजयाताई प्रकाश पवार, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.संगीताताई गवळी, पंचायत समिती गटनेते संजू तात्या पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अमोल चौधरी, इमरान शेख,
संकटाच्या काळात शिंदी येथील शेतकऱ्यांचे दातृत्व
आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विनामोबदला दिली फवारणी यंत्र
चाळीसगाव तालुक्यासह राज्यभरात कोरोना निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली जात असल्याने फवारणी यंत्र व औषध यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. चाळीसगाव शहरात फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येत होती. त्यानुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांनी शिंदी येथील प्रगतीशील शेतकरी व भाजपाचे माजी पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब राउत यांना विनंती केली असता त्यांनी तात्काळ विनामोबदला फवारणी यंत्र देण्याचे मान्य केले सोबतच शिंदी येथील शेतकरी गोरख जाधव, रमेश राउत, बाजीराव राउत, पांडुरंग आगोने, संतोष सोनवणे, विलास राखुंडे यांनी देखील आपले ट्रॅकटर व फवारणी यंत्र देण्याचे दातृत्व दाखविल्याने संकटकाळात बळीराजा मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले.
आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र