नागपूर हिवाळी अधिवेशनात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतल्या जुन्या आजी माजी आमदारांच्या गाठीभेटी

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

आठवणींना उजाळा , मतदारसंघाच्या दृष्टिकोना तल्या विविध योजना व नवनवीन प्रकल्पाबाबत निवेदने, बैठक व चर्चा

नागपूर — येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमीत्ताने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज विधिमंडळात जुन्या व नव्या आमदार मित्रांच्या गाठीभेटी घेतल्या. यात प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री नामदार उद्धवसाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस ,माजी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, गृहमंत्री नामदार एकनाथजी शिंदे ,माजीमंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, आ. किशोर आप्पा पाटील,आमदार संतोष दानवे, आ. राहुल कुल, आ. राहुल आहेर, आमदार नरहरी झिरवळ,आ.नितीन पवार, अनिल अण्णा कदम, माजी मंत्री राम शिंदे, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह अनेक आजी माजी आमदार मित्राच्या भेटी घेतल्या, गेल्या पाच वर्षात विधानसभेत या सहकाऱ्यांसोबत केलेल्या कामकाजाच्या आठवणीना उजाळा मिळाला. जळगांव लोकसभा मतदारसंघात नवनवीन योजना राबविणे आणि अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर चर्चा केली.सर्वाच्या शुभेच्छा, सदिच्छा भेटी घेतल्या, मतदारसंघातील काही कामाबद्दल निवेदने दिलीत,
विशेषतः माजी जिल्हाध्यक्ष स्व.उदय बापू वाघ यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या आमदार स्मिताताई वाघ याची भेट घेतली आपले दुःख विसरून पक्षाच्या आणि विधिमंडळ कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांची देखील भेट घेतली त्यावेळी स्व. बापूंच्या आठवणींना उजाळा मिळाला…आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

Don`t copy text!