सेवा सहयोग फाउंडेशन व शिवनेरी फाउंडेशन संचलित भुजल अभियान चाळीसगाव
समाचार एजेंसी न्यूज़ एसएम न्यूज़ के साथ 9889789714 समाचार एजेंसी न्यूज़ एसएम न्यूज़ के साथ 9889789714
मौजे सेवानगर, ता.चाळीसगाव येथील माळावरील रस्त्यांचे जटिल प्रश्न सोडविले आमदार मंगेश दादा चव्हाण व गुणवंत दादा सोनवणे
चाळीसगाव दि.२४ गेल्या चाळीस वर्षापासून अतिशय खरतर,त्रासदायक असलेल्या हा रस्ता तूडवत समस्त गावकरी शांततामय असणाऱ्या माळरानावर शेती करीत असे. एकविसाव्या शतकात ग्रामीण जनता आता बरीच पुढारली…! पाटे- वरवंटे ऐवजी मिक्सर, माठ ऐवजी फ्रिज,मोठे-मोठे टीव्ही, स्मार्टफोन्स, गावातून जाणाऱ्या हायवेवरून भरकन धावणार्या बाईक व मोटारी, एकूणच ग्रामीण भागात अमुलाग्र बदल झालेले आपण पाहतो व अनुभवतोय. मात्र नित्याने शेतात जाण्यास उपयोगी असणारा शिवार रस्ता आजही नाविण्याच्या प्रतीक्षेत होता. कित्येक निवडणुका, मेळावे, बैठका ह्या रस्त्यांच्या दुरुस्ती- बांधणीवरुन होऊन गेल्या. “हा रस्ता तेवढा झालाच पाहिजे..!” असा दु:खद सुर लोकांमधून नेहमी निघे.
रस्त्याच्या बाबतीत लिहायचं म्हटलं तर दूर पर्यंत पसरलेल्या माळावर सगळी कोरडवाहू अर्थात फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे. शेती करायची म्हणजे पावसाळ्यात जाणं-येणं झालंच…!
खरंतर हा एकूण चार किमी लांबीचा रस्ता आदी ते अंतापर्यंत खरतरच…! पण दुर्दैवाने जावेच लागते. त्यातील एक किलोमीटर चा रस्ता म्हणजे अवघडच..! प्रचंड चिखल, पाण्याने भरलेले डबके, दुतर्फा झाडे झुडपांनी वेढलेला, ना पायी जाता येई… ना बैलगाडी…, कुणी गेलंच तर तर पाय रुतून बसे. बैल, शेळ्या, मेंढ्या त्या ठिकाणी फसून मेल्याचं उदाहरण अनेकांनी पाहिलं आहे. अनेकदा काढलेली पिके महीनोनमहिना शेतातठेवावा लागे. काही शेतमाल डोक्यावर घेऊन आणावं लागे. चिखलात पाय फसत… दुसरा पाय काढत…. अंतर कापावं लागे आणि म्हणून या रस्त्यास पर्यायी रस्ता म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची शेती …! मग त्या शेतांतील पिकांचे प्रचंड नुकसान होत असे. हा एवढा रस्ता झाला पाहिजे ही प्रत्येकांची मागणी…! पण करणार कोण…? हा प्रश्न होता;आणि हा रस्ता कित्येक वर्ष तरी होणार नाही यावर देखील लोकांना ठाम विश्वास होता.
ही वाट सुखाची करण्यासाठी आम्ही विचार केला आणि आमदार मंगेश दादा चव्हाण व गुणवंत दादा सोनवणे यांच्या शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानांतर्गत विषयी ऐकले व प्रकल्प समन्वयक राहुल राठोड यांच्या माध्यमातून मंगेश दादा व गुणवंत दादा सोनवणे यांची भेट घेतली.सदर रस्ता करण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.
सेवा सहयोग फाउंडेशन कडून जेसीबी मशीन उपलब्ध झाले व शेतकऱ्यांकडून डिझेल खर्चासाठी वर्गणी करण्यात आली आणि कामाचा श्रीगणेशा केला….साधारणत: अवघड व जीवघेणा असणारा 1 किमी लांबीचा रस्ता केवळ 60,000/- रुपयात बनवून तयार झाला. यात शासनाचा अंदाजे ६ ते ७ लाख रुपये वाचले हे विशेष आणि यासाठी शेतकरी गेल्या 40 वर्षापासून वाट पाहत होते.शिवनेरी फाउंडेशन अंतर्गत भूजल अभियानाअंतर्गत शिवार रस्ता बनविण्यासाठी शेतकऱ्यांची समस्या चुटकीसरशी सुटली.यामुळे शेतकरी आपली समस्या स्वतः सोडविल्याने एक सकारात्मकता निर्माण होण्यास मदत झाली. माळावरील रस्त्याचे हे जटिल प्रश्न सोडविल्याने सर्व शेतकरी, नागरिक शिवनेरी फाउंडेशन, भूजल अभियान व सेवा सहयोग फाऊंडेशन चे मनापासून आभार मानले.
रस्त्याच्या या कामाच्या यशस्वीतेसाठी जि प.श्री भूषणजी पाटील व मा.अमोलजी चव्हाण यांनीदेखील देणगी देऊन सहकार्य केले
स्थानिक पातळीवर पाणी समिती प्रमुख सुनिल राठोड, उपसरपंच समाधान चव्हाण,ग्रामरोजगार सेवक साईनाथ चव्हाण, ग्रा.पं. सदस्य, पापालाल राठोड,शेतकरी दत्तू जाधव, दावल चव्हाण, श्रीपत चव्हाण यांनी परिश्रम घेतले