सहकाराचे पावित्र्य टिकविणारी सभासदांची एकजूट वाख्याण्यासारखी

मोहम्मद आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

सहकाराचे पावित्र्य टिकविणारी सभासदांची एकजूट वाख्याण्यासारखी
——–
खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
———————
राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे सेवकांच्या पतपेढीच्या सभासद, गुणवंत पालक सत्कार समारंभ
————
रा वी सेवक पतसंस्था भरभराटीचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले कौतुक

चाळीसगाव — जग डिजिटल होत माणसे दुरावत जात आहे. सहकाराचे पावित्र्य टिकविणारी सभासदांची एकजूट वाख्याण्यासारखी आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सहकाराचे तत्व जिवंत राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे सेवकांनी आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून सांघिक भावना कायम ठेवत सकारात्मक उपक्रम सातत्याने घेतले आहे. जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेली पतसंस्थेने यापुढे देखील विविध कार्यक्रम आयोजित करावेत मी आपल्या पाठीशी भक्कम उभा राहीन अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. आज राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे सेवकांच्या पतसंस्था आयोजित सत्कार प्रोत्साहनपर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. कैलास नगरातील राष्ट्रीय सहकारी संस्था सेवकांच्या पतपेढी सभागृहात आज हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एम बी पाटील, सचिव अरुण बापू निकम , दुय्यम सचिव संजय आबा पाटील,उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख, संचालक विश्वासराव चव्हाण, एल टी चव्हाण सर, आनंदराव पाटील, मनोहर सूर्यवंशी, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष गुलाबराव भोसले पतसंस्थेचे अध्यक्ष बी एम बागल सर, उपाध्यक्ष मंगलताई साळुंखे, सचिव आर टी मोरे, खजिनदार पी पी देशमुख अदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पतसंस्थेचे जेष्ठ सभासद, त्यांचे गुणवंत विद्यार्थी ,पालक सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकातून अध्यक्ष बी एम बागल संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी विविध स्पर्धेत, वैद्यकीय , क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविणारे विद्यार्थी, आदर्श शिक्षक पदाधिकारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की अतिशय चांगल्या पद्धतीने पतसंस्थेचे कामकाज सुरू असून ६५० सभासदांच्या सहकार्याने संस्था १०० कोटींच्या आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत असताना सतत लहान मोठे उपक्रम सातत्याने घेत असते. यापुढे पतसंस्थेच्या माध्यमातून व्याख्यानमाला , शिबिर, कार्यशाळा यांचे आयोजनासाठी पुढाकार घ्यावा मी दिल्लीत असलो तरी गल्लीतील नाळ तुटू देणार नाही .मी भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा राहीन .
अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन डी बी महाजन तर आभार ज्ञानदेव ठोके यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक शरद पाटील, सुधाकर लबांडे, विजय वाबले, प्रमोद अमृतकर, सतीश महाजन, अशोक देवरे प्रवीण रणदिवे, रमाकांत जावरे, तुकाराम पाटील, लक्ष्मीकांत मगर, मीनाक्षी जाधव , राजेंद्र बहाळकर यांनी परिश्रम घेतले. माजी नगरसेवक संजय घोडेस्वार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मोहम्मद आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

Don`t copy text!