20 फेब्रुवारी रोजी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात बांद्रा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंचा मोर्चा – गौतम सोनवणे*

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

मुंबई- रेल्वेच्या; संरक्षण मंत्रालयाच्या ;केंद्र सरकारच्या जमिनीवरील तसेच वन जमिनीवरील आणि टाटा पॉवर च्या विजवाहिनी खाली राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता बांद्रा येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. दि. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या संविधान निवासस्थानापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा चे सभेत रूपांतर होईल अशी माहिती संयोजक गौतम सोनवणे आणि सुमित वजाळे यांनी दिली आहे.

गायरान जमिनीवरील 14 एप्रिल 1990 पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्याचा शासन आदेश आहे. त्यात सुधारणा करून 14 एप्रिल 2014 पूर्वीचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणारा शासन निर्णय सरकार ने घ्यावा; भूमिहीनांना 5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी; मागासवर्गीयांचा सरकारी नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा; सन 2014 च्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी तसेच एस आर ए योजनेत 500 फुटांचे घर देण्यात यावे ;बेरोजगारांना रोजगार द्यावा रोजगार देता येत नसेल तर बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फ़े राज्यभर प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून भूमी मुक्ती आंदोलन दि. 20 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल अशी घोषणा केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.त्यानुसार मुंबईत बांद्रा येथे रिपाइं मुंबई प्रदेश तर्फे झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.या मोर्चात रिपाइं च्या मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे रिपब्लिकन झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष सुमित वजाळे यांनी केले आहे.

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

Don`t copy text!