शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारू,
आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र 9657564820
भाजपा किसान मोर्चाचा शासनाला निवेदनाद्वारे इशारा
चाळीसगाव – गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी असो वा कोरोना महामारी असो त्याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षीदेखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून खरीप हंगामात खर्च देखील निघणार नाही इतके अत्यल्प उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले आहे. मात्र जो काही थोडाफार शेतीमाल आहे तो अजून घरात देखील आलेला नसताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या आदेशाने महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा खंडित केला असून मागील ४ महिन्यांची चालू बिल भरण्याचा तगादा लावला आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी जास्त चिंतेत आला आहे. मुघलांनी देखील जितकी लुट जनतेची केली नव्हती तेव्हडी लुट महाविकास आघाडी सरकार करत आहे, या वसुली सरकारचा आम्ही निषेध करतो. जर महावितरण कंपनीने येत्या ३० तारखेपर्यंत शेतकऱ्यांची वीजतोडणी थांबवली नाही तर येणाऱ्या दिवाळीच्या काळात आम्ही सर्व शेतकरी काळी दिवाळी साजरी करून व भाजपा किसान मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा चाळीसगाव येथे भाजपा किसान मोर्चाने निवेदनाच्या माध्यमातून राज्य शासनाला दिला आहे.
चाळीसगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसिलदार हेमंत धनराळे यांनी भाजपा पदाधिकारी यांचे निवेदन स्विकारले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस अमोल चव्हाण, नगरसेवक नितीन पाटील, सदानंदभाऊ चौधरी, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, अमोल घोडे, ज्ञानेश्वर बागुल, कैलासनाना पाटील, अलवाडी येथील किसान मोर्चा तालुका पदाधिकारी ज्ञानेश्वर पाटील, जामडी येथील दीपकसिंग परदेशी, बिलाखेड येथील फकीरा पाटील, तांबोळे सरपंच निलेश जाधव आदी उपस्थित होते.
आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र 9657564820

