रिपब्लिकन फिल्म आणि टेलिव्हिजन युनियन च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉ.गीत ठक्कर यांची नियुक्ती
आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र 9657564820
मुंबई दि.17 – अंधेरीतील समाजसेविका कुमारी डॉ. गीत एस ठक्कर यांची रिपब्लिकन फिल्म आणि टेलिव्हिजन युनियन च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीचे पत्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन फिल्म आणि टेलिव्हिजन युनियन चे किशोर मासुम उपस्थित होते.
डॉ गीत एस ठक्कर या गुजराती भाषिक असुन परफेक्ट वूमन मॅगझीन च्या संपादिका आहेत. अंधेरी आणि मुंबई उपनगरात त्या प्रसिद्ध समाजसेविका आहेत.चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील कलावंतांना त्या मदत करण्यात पुढे असतात. कला क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. त्यांनी रिपब्लिकन फिल्म आणि टेलिव्हिजन युनियन मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय चांगला असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी डॉ गीत ठक्कर यांचे स्वागत करीत शुभाशीर्वाद दिले आहेत.
आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र 9657564820