आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्राचा दर्जा मिळणे सोलापूरसाठी अभिमानस्पदः आ. सुभाष देशमुख

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

सोलापूरकरांनी संधीचा लाभ घेऊन उद्योगाला बळकट करण्याचे आवाहन

 

सोलापूर जिल्ह्यास परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) वस्त्रोद्योग व कृषी उत्पादनाचे निर्यात केंद्र बनवण्यासाठी देशातील एक्सपोर्ट सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब असून भविष्याच्यादृष्टीने सोलापूरसाठी खूप मोठी संधी आली आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला निर्यात केंद्र म्हणून सोयी सुविधा मिळाल्यास एक्सपोर्ट व रोजगारही वाढणार आहे. गारमेंट, टेक्सटाइल, आयटी, कृषी यासह अनेक क्षेत्रासाठी सगळ्यांना एक खूप मोठी संधी आली असून सोलापूरकरांनी या संधीचा लाभ घेऊन आपापल्या आपल्या उद्योगाला बळकट करावे, असे आवाहन सोलापूर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले आहे.
मागील चार-पाच वर्षात युनिफॉर्म व गारमेंटचे बंगलोर, मुंबई आणि सोलापुरात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन गारमेंट असोसिएशन भरवले होते. त्या अंतर्गत आपण सगळ्या देशांच्या दूतावासांना व भारतातील विदेश मंत्रालय, लघुउद्योग मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालयांना प्रदर्शनात संमेलीत करून सोलापूर युनिफॉर्म उत्पादनात एक आगळावेगळे शहर आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय मार्केटिंगची गरज आहे, याचे मार्केटिंग केले होते. जगातील पहिले टेरीटॉवेल प्रदर्शनही सोलापुरात आयोजित केले होते. यासर्वांचे सोलापूर सोशल फाऊंडेशनने मार्केटिंग केले होते. या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम म्हणजेच डीजीएफटीने डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब या भारत सरकारच्या उपक्रमासाठी निर्यात हब म्हणून देशातील भुवनेश्वर (ओडिशा), इम्फाल (मणिपूर), जम्मू (जम्मू व जम्मू-काश्मीर), रामनगर (कर्नाटक) आणि सोलापूर (महाराष्ट्र) ला मान्यता दिली आहे. यात सोलापूरचे निवड होणे आपले मोठे यश आहे. सोलापूरची वस्त्रोद्योग व कृषी उत्पादनाचे निर्यात केंद्र बनवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आता जरी शहराची निवड झाली असली तरी निर्यात केंद्राचा धोरण बनवताना कोणकोणती सुविधा व गरज भासणार आहे, याची माहिती केंद्र शासनाला द्यायची आहे. त्यासाठी आपण सोलापूर सोशल फाऊंडेशनच्यावतीने झुम ऍपद्वारे शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी, उद्योजकांशी चर्चा करणार आहोत. सर्वांनी सोलापूरसाठी पायाभूत सुविधा, वाहतूक सुविधा, पाणी सुविधा, विमानसेवा या व्यतिरिक्त सोलापूरला आणखी कोणत्या उद्योगात निर्यातीला वाव मिळून शकतो, याची माहिती द्यावी. तरी सगळ्यांनी आवर्जून झुम ऍपमध्ये भाग घ्यावा. आपली पूर्ण माहिती socialsolapur@gmail.com या मेलवर पाठवावी जेणेकरून सोलापूरला एक्सपोर्ट हब बनवण्यास मदत होईल, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले.

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

Don`t copy text!