भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील व प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने रोडवर पाण्याचा शिडकावा…
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगांव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बँक ऑफ बडोदा पर्यंतच्या रस्त्याची व गटारींची दुरुस्ती करण्यात आली होती. या रस्त्यावर काही दिवसांपासून धुळीचा त्रास आजूबाजूच्या दुकानदारांना व वाहन धारकांसह नागरिकांना होत असल्याने त्यावर पाण्याचा शिडकावा होण्याची मागणी केली जात होती. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर तात्या पाटील यांच्या पुढाकाराने व प्रतिकदादा पाटील यांच्या सहकार्याने सदर रस्त्यावर आज संध्याकाळी टँकर द्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली. त्यामुळे सदर रस्त्यावरील व्यापारी व नागरिकांना धुळीच्या त्रासापासून दिलासा मिळाला आहे. येत्या काळात देखील आवश्यकतेनुसार नगरसेवक घृष्णेश्वर तात्या पाटील व प्रतिकदादा पाटील यांच्या माध्यमातून सदर रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जाणार आहे तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून सदर रस्त्याच्या पक्क्या डांबरीकरण साठी देखील टेंडर काढण्यात यावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी दिली.

